मुंबईची सुरुवात देखील खराब झाली होती
\nआज IPL 2024 चा 14 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. वानखेडेवर होणाऱ्या या मॅचमध्ये राजस्थानने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय राजस्थानच्या चांगलाच पथ्यावर पडला आणि मुंबईची सुरुवात खराब झाली. कॅप्टन पंड्या आणि तिलक वर्मा व्यतिरिक्त एकही बॅट्समनला मैदानावर टिकून खेळता आलं नाही आणि मुंबईने केवळ 125 रन्सपर्यंत मजल मारली. | MI vs RR Live Score
हार्दिक आणि तिलकची महत्वाची भागीदारी
\nहार्दिक पांड्या आणि टिळक वर्मा यांच्यात चांगली भागीदारी पाहायला मिळाली. दोघांनी काही काळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला.मात्र चहलने पांड्याला (३४) आऊट करत ही जोडी फोडली. दोघांनी ५६ रन्सची महत्वाची भागीदारी केली. | MI vs RR Live Score