मुंबई : आज आयपीएलमधील 20 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI Vs RCB) यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. दोन्ही (MI Vs RCB) संघाबद्दल बोलायचे झाले तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा फॉर्म या हंगामात फारसा चांगला राहिलेला नाही तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कसा आहे दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड? जर आपण मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर नजर टाकली तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 33 सामने खेळले गेले आहेत ज्यात मुंबईने 19 सामने जिंकले आहेत तर आरसीबीने मुंबईविरुद्ध 14 सामन्यात विजय मिळवला आहे. आजचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. वानखेडे स्टेडियम हे मुंबई इंडियन्सचे होमग्राउंड आहे. या मैदानावरील दोन्ही संघाचा रेकॉर्ड बघितला तर आरसीबीने २०१५ मध्ये मुंबईला शेवटचे या मैदानावर हरवले होते. त्यानंतर त्यांना अजूनपर्यंत मुंबईला या मैदानावर पराभव करता आलेले नाही. हा मुंबईसाठी प्लस पॉईंट आहे. २०१५ नंतर मुंबई इंडियन्सने सलग 6 वेळा या मैदानावर त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे एकप्रकारे मुंबई इंडियन्सचा या मैदानावर दबदबा पाहायला मिळत आहे. सध्या दोन्ही संघाची काय स्थिती? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने या हंगामात आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत ज्यात त्यांना फक्त 1 सामना जिंकता आला आहे. हा विजय त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मिळवला आहे. तर चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स या संघाविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई आठव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबद्दल (MI Vs RCB) बोलायचे झाले तर त्यांनी आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध विजय मिळवला आहे तर गुजरात सुपर जायंट्स संघाकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. सध्या आरसीबी 4 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.