MI vs KKR : रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार ! मुंबई संघासाठी व्हिलन ठरलेल्या ‘या’ खेळाडूचे होणार आगमन

मुंबई : आज आयपीएलमधील 12 वा सामना मुंबई आणि कोलकाता (MI VS KKR) यांच्यात पार पडणार आहे. दोन्ही संघाबद्दल बोलायचे झाले तर यंदाच्या सिझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दोन सामने खेळले असून यापैकी एका सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले. तर मुंबई इंडियन्सनेदेखील दोन सामने खेळले असून त्या दोन्ही सामन्यात (MI VS KKR) त्यांचा पराभव झाला आहे. ते अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत आहेत.
मुंबई संघासाठी व्हिलन ठरलेल्या ‘या’ खेळाडूचे होणार आगमन
यादरम्यान या सामन्याआधी केकेआरच्या संघाला एक मोठी गुड न्यूज भेटली आहे. रोहित शर्माचा सर्वात मोठा दुश्मन असलेला खेळाडू आता फिट झाला असून तो वानखेडेवर खेळणार आहे.रोहित शर्माला जड जाणारा हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून सुनील नरेन आहे. सुनील नरेन वानखेडेवर खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पोटाच्या दुखण्यामुळे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मागील सामन्यात नरेनला खेळता आलं नाही, तो आता पूर्णपणे बरा झाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यासाठी सुनील नरेन पूर्णपणे तंदुरुस्त असेल. कालपासून तो सराव करत आहे अशी माहिती केकेआरचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी दिली आहे.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 34 वेळा आमने – सामने आले आहेत. यापैकी 11 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स तर 23 सामन्यात मुंबई इंडियन्स विजयी झाली आहे. दोघांमध्ये खेळलेल्या सामन्यात सर्वात जास्त स्कोअर केकेआरने 232 धावांचा केला होता. तर मुंबई इंडियन्सचा सर्वाधिक स्कोअर 210 धावा असा आहे.
वानखेडे स्टेडियमवर रेकॉर्ड?
वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत केकेआर आणि मुंबईमध्ये 11 वेळा सामने खेळवले गेले असून यात 9 वेळा मुंबईने तर 2 वेळा केकेआरने विजय मिळवला आहे.
आजचा सामना हा वानखेडे स्टेडियम पार पडणार आहे. मुंबई इंडियन्स हे होम ग्राऊंड आहे. तेव्हा होम ग्राउंडवर मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये आपलं विजयाचं खातं उघडण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार) , नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, विघ्नेश पुथूर.
कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेईंग 11
क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, सुनील नरेन, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.





