\n\nSanju Samson stepping up at Wankhede again 🤩
\nHe is adjudged the Player of the Match for his hundred 🏅
\nWATCH HIS KNOCK ▶️ https://t.co/CEOEHXRUR7#TATAIPL | #KhelBindaas | #MIvCSK pic.twitter.com/SmWGHXCEX1
\n— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026
\nसलामीला आलेल्या संजू सॅमसनने मुंबईच्या गोलंदाजांना मैदानावर पळता भुई थोडी केली. त्याने अवघ्या ५४ चेंडूंत १० चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा कुटल्या. हे त्याचे या मोसमातील दुसरे शतक आहे. संजूला कर्णधार ऋतुराज गायकवाड (२२) आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस (२१) यांनी मोलाची साथ दिली. संजूच्या या खेळीमुळे चेन्नईने २०० धावांचा टप्पा ओलांडला.
\n\nBest #TATAIPL figures ✅
\nAkeal Hosein spun his 𝙒𝙚𝙗 𝙖𝙩 𝙒𝙖𝙣𝙠𝙝𝙚𝙙𝙚 🕸️
\nRelive his spell ▶️ https://t.co/ndD8uBfdXd #KhelBindaas | #MIvCSK | @AHosein21 pic.twitter.com/xkFlqEJLwX
\n— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026
\nमुंबई इंडियन्सच्या इतिहासातील हा धावांच्या फरकाने झालेला सर्वात मोठा पराभव आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. मुंबईचा संपूर्ण संघ १९ षटकांत १०४ धावांत गारद झाला. मुंबईकडून सूर्याने (३६) आणि तिलकने सर्वाधिक (३७) धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत गझनफर आणि अश्वनी कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले, तर बुमराहला १ विकेट्स मिळाली, पण ते धावा रोखण्यात अपयशी ठरले. या पराभवामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये मोठी निराशा पसरली असून, ऋतुराजच्या नेतृत्वाखालील चेन्नईने वानखेडेवर एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.