प्रभात वृत्तसेवा म्हसवड – म्हसवड शहरात बाजार पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या मंत्री चषक भव्य नाईट प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले. यावेळी ना. गोरे यांनी बॅट हातात घेत केलेल्या फटकेबाजीने उपस्थित युवकांनी एकाच जल्लोष केला.उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी मंत्री गोरे यांनी मैदानावर प्रवेश करताच परिसरात जयघोष दुमदुमला. यावेळी त्यांनी बॅट हातात घेत, मैदानात उतरून फटकेबाजी करत उपस्थितांना रोमांचित केले. राजकारणात जशी फटकेबाजी करतात, तशीच आज क्रिकेटच्या मैदानातही केली.यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट, डॉ. वसंत मासाळ, माजी नगरसेवक संग्राम शेटे,युवानेते करण पोरे, सपोनि अक्षय सोनवणे, शंकर विरकर, आप्पा पुकळे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी स्वतः गोलंदाजी करत मंत्री गोरे यांना खेळात सामील केले, तर प्रेक्षकांनीही आनंदाने जल्लोष केला. स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले की, या नाईट क्रिकेट स्पर्धेत म्हसवड व परिसरातील अनेक नामांकित संघ सहभाग घेत असून, सामन्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रात्रीच्या प्रकाशात सजवलेल्या मैदानात रंगणार्या या स्पर्धेमुळे म्हसवड शहरात उत्साह पसरला आहे. उद्घाटनानंतर मंत्री गोरे यांनी म्हसवडचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराला भेट देत सुरू असलेल्या शाही विवाह सोहळ्याचे दर्शन घेतले.