तीन आठवड्यांनंतर दिल्लीत मेट्रो सुरू

नवी दिल्ली – दिल्लीत करोनाची स्थिती सुधारल्यानंतर मेट्रो सेवा सुरू करण्यास अनुमती देण्यात आली असून आज तीन आठवड्यांच्या अवधीनंतर ही सेवा सुरू झाली आहे. तथापि या मेट्रोत 50 टक्के क्षमतेनेच प्रवासी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. 20 मे पासून ही सेवा बंद होती. त्यामुळे दिल्लीकरांची मोठीच कुचंबणा होत होती.

तथापि सोमवारपासून ही सेवा सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्री केजरवाल यांनी शनिवारीच केली होती. दिल्लीतील करोना आता बऱ्यापैकी आटोक्‍यात आला असून शहरातील पॉझिटीव्हीटी रेट 0.5 टक्के इतका नियंत्रणात आला आहे.

आज दिवसभरात दिल्लीत केवळ 381 नवे करोनाबाधित आढळून आले. दरम्यान बुधवारपासून मेट्रोच्या फेऱ्या पूर्वीप्रमाणेच सुरू केल्या जातील असेही आज मेट्रो कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.