NDAच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

नवी दिल्ली- २०१९ लोकसभेच्या अभूतपूर्व यशानंतर आज राजधानी दिल्लीत भाजप आणि एनडीएच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. याबैठकीत एनडीए सरकारचे सर्व खासदार आणि एनडीएच्या इतर घटक पक्षांनी देखील हजेरी लावली होती. बैठक पारपडल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश सिंह बादल, राजनाथ सिंह, नितीश कुमार, राम विलास पासवान, सुषमा स्वराज, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, के.पलानी स्वामी, कोनराड संगमा आणि निफिओ रियो यासर्वांनी राष्ट्रपती ‘रामनाथ कोविंद’ यांची भेट घेतली.

एनडीएच्या आजच्या बैठकीत एनडीए पदी ‘नरेंद्र मोदी’ यांची निवड करण्यात आली. शिवाय, एनडीएच्या 353 खासदारांनी देशाच्या पंत प्रधानपदासाठी ‘नरेंद्र मोदी’ यांच्या नावाला एकमतानं समर्थन दिलं.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here