व्यापाऱ्यांनो, अडचणी सांगा, त्या सोडवू

श्रीरामपूर -शहरातील व्यापाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी आपल्याला सांगाव्यात. त्या सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिले.
येथील भाजपचे माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड यांच्या कार्यलयात त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, गिरधर आसने, सरपंच बाबासाहेब चिडे, विजय शिंदे, डॉ.मनोज छाजेड आदी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांशी सवांद साधताना शहरात यापुढे व्यापाऱ्यांना यापुढे ज्या अडचणी येतील त्यांनी थेट आपणाशी संपर्क साधावा, असे आवाहन करत खासदार डॉ. विखे म्हणाले, आम्ही श्रीरामपूरात लक्ष घातले की अनेकाच्या पोटात दुखते परंतु येथून पुढील काळात आपण शहरात लक्ष घालणार आहोत. नगरमध्ये उड्डाणपुल झाला. अनेक अडचणी आल्यात त्यावर मात करत आता पूल उभा राहिला आहे. या पुलाच्या खालील बाजूस पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवन चरित्र रेखाटणार आहोत.
विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यावेळी संगमनेर रस्त्यावरील रिमांड होम जवळील अंडरग्राउड रेल्वे पुलाच्या कामास मंजुरी मिळाली असल्याची व्यापाऱ्यांनी सांगितले. खासदार विखे म्हणाले पुढील आठवड्यात सोलापूर येथे सर्व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यात हा विषय मांडून मार्गी लावण्यात येईल.
यावेळी नितीन सानप, सतीश कुकुलोळ, अभिजित नवलाखा, संदिप भोसले, गणेश तिडके, सागर कुऱ्हाडे, महावीर काला, राजेश कासलिवाल, दर्शन बालानी, दिलीप बाठिया, मुकेश कोठारी, बाळासाहेब खाबिया, सूरज सोमाणी, प्रशांत देशमुख, विशाल आरोटे, मनोज नवले, निलेश बोरावके, विराज आंबेकर, संतोष उदावंत, राहुल सराफ, विजय कटारिया, अमोल देवधर, श्याम ठक्कर, किशोर गदीया, गौतम उपाध्ये, संतोष कुंदळे, राजेद्र ससे, विनोद चोरडिया, नविन गदिया, सचिन कोठारी, कांतिलाल बोकडिया, संतोष संघवी, आयाज तांबोळी, अमोल रोटे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.





