मर्सिडीज कंपनीकडून दरवाढ जाहीर
Updated On:

नवी दिल्ली – आयातीचा खर्च वाढत असल्यामुळे विविध क्षेत्रातील कंपन्या आपल्या उत्पादनाच्या दरात वाढ करीत आहेत. मर्सिडीज बेंझ कंपनीने आपल्या विविध उत्पादनाच्या दरात एक एप्रिलपासून तीन टक्क्यांपर्यंत दरवाढ जाहीर केली आहे.
कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे ही दरवाढ करावी लागत आहे. आता या कंपनीची वाहने 50 हजार ते 5 लाख रुपयापर्यंत महाग होतील असे या कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टीन श्वेंक यांनी म्हटले आहे की, आम्ही आतापर्यंत दरवाढ टाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एकूण परिस्थिती पाहता दरवाढ करण्याशिवाय पर्याय दिसत नाही. याअगोदर ऑडी कंपनीने दरवाढ जाहीर केली आहे.
टॅग्स:





