‘मेरा दिल ये पुकारे आजा’ पाकिस्तानी मुलीच्या डान्स स्टेप्स केल्या कॉपी ! अभिनेत्री माधुरी दीक्षित ट्रोल Watch Video

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी तरुणी आयशाचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आयशाने ‘मेरा दिल ये पुकारे आजा’च्या रिमिक्स व्हर्जनवर डान्स केला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हे गाणे ट्रेंड झाले आहे. यानंतर अनेकांनी त्या गाण्याप्रमाणे डान्स केल्याचे देखील पाहायला मिळाले. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने देखील याच गाण्यावर एक व्हिडीओ केला आहे. परंतु या व्हिडिओनंतर चाहत्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
या व्हिडिओतील माधुरीचा साडीमधील लूक अनेकांना खूपच सुंदर वाटला. एकीकडे चाहते तीच कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे हा ट्रेंड फॉलो केल्याबद्दल तिला ट्रोलही केले जात आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. माधुरी सारख्या अभिनेत्रीने देखील हा ट्रेंड फॉलो केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याचे सोशल मिडीआयवर पाहायला मिळाले.
View this post on Instagram
एकाने कमेंट केली आहे, ‘विश्वासच बसत नाही की एवढी चांगली डान्सर असूनही ती फालतू स्टेप्स कॉपी करत आहे. माधुरी जी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तर दुसऱ्याने लिहिले की, ‘माधुरी दीक्षितला हा ट्रेंड फॉलो करावा लागतो हे पाहून खूप वाईट वाटते.’ माधुरी दीक्षित ‘झलक दिखला जा’ या शोला जज करत होती, ज्याचा फिनाले नुकताच पार पडला.त्यासोबत ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या मिमी या सिनेमात माधुरी प्रमुख भूमिकेत होती. आगळा वेगळा विषय असल्यामुळे या चित्रपटाचे सर्वांनी कौतुक केले आहे.

