#Video : बैठक मुंबईत अन्‌ राजकारण तापले पुण्यात

Updated On:

पुणे  – शहराच्या प्रश्‍नांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि मनपा विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत मंगळवारी बैठक घेतली. पण, यावरून पुण्यात राजकारण मात्र तापले आहे.

“शहराचा महापौर असतानाही पुण्याच्या प्रश्‍नांबाबत होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण नाही’ अशी टीका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्‌विटद्वारे केली. तर, हा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी खोडून काढत “निमंत्रण असतानाही महापौर खोटारडेपणा करत आहेत,’ असा आरोप जगताप यांनी ट्‌विटद्वारेच केला. या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा दिवसभर चाललेला वाद मात्र शनिवारी सोशल मीडियावर रंगला होता.

“महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्‍नांसंदर्भात बैठकीचे निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे. करोना संकटाशी सामना करताना शहराचे हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही.

उलट मी करोनाबाधित असल्याचा काळवगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेऊन पुढे जात राहिलो. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करुन न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील. कारण, पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत. गेल्या चार वर्षांत झालेली झालेली विकासाची कामे आणि सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांची माहिती समस्त पुणेकरांना आहे. तरीही आपल्याला डावलून का होईना, पण शहराच्या प्रश्‍नांसंदर्भात बैठक होतेय, याचं स्वागतच!’
– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

“पुणे शहराच्या प्रश्‍नांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीचे आपल्याला निमंत्रण नव्हते, असा कांगावा महापौर मुरलीधर मोहोळ हे सोशल मीडियावर करत आहेत. परंतु, पुण्यासारख्या शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना हा खोटेपणा शोभणारा नाही. या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी व्हावे, असे निमंत्रण उपमुख्यमंत्री कार्यालयातून 28 जून रोजी महापौरांना देण्यात आलेले होते.

त्यानुसार पुणेकरांच्या हितासाठी बैठकीत सहभागी होणे तर दूरच, उलट निमंत्रण नसल्याचा कांगावा करत आहेत. राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत. गरज असेल तिथे जरूर राजकारण करा. परंतु, पुणेकरांच्या हितात राजकारण करू नका. महापौरांनी त्यांच्या स्वत:च्या वृत्तीला पुणेकरांचा अपमान समजू नये. पाच दिवसांपूर्वी पालिका आयुक्त आणि महापौरांना विचारून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
– प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव