सातारा – अनेक वर्षे रखडलेले साताऱ्याचे मेडिकल कॉलज तातडीने मार्गी लावण्याबाबत जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना सूचना केल्या असून त्याबाबत सोमवारी मंत्रालयात सचिव स्तरावरची बैठक घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कॉलेजसाठी कमी पडणारी 69 एकर जागा खरेदी करून बांधकाम सुरू करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, “बारामती व सातारा ही दोन मेडिकल कॉलेज सोबतच मंजूर झाली. असे असताना बारामतीचे कॉलेजमधून एक वर्ग सुरू झाला आहे.
मात्र, साताऱ्याचे कॉलेज अजून जागा अन् इतर गोष्टीत अडकून पडल्याने पूर्ण झाले नाही, याची खंत राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत साताऱ्याचे कॉलेज पूर्ण करण्यासाठी लागेल ती मदत करू. आवश्यक त्या पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या असून पालकमंत्री त्याचा प्रत्येक आठवड्याला पाठपुरावा करतील. जलसंपदा विभागाशी चर्चा करून जागेचा प्रश्न सोमवारी निकाली काढू. त्यासाठी जलसंपदा मंत्री,