उदयनराजेंच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा आज मेळावा

कराड – सातारा लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावनिहाय बूथ प्रतिनिधी व कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी (दि. 2) सायंकाळी 6.30 वाजता हॉटेल पंकज लॉनवर आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. उदयनराजे भोसले, आ. आनंदराव पाटील, मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ. नीलम येडगे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस पै. नाना पाटील, कराड दक्षिण सेवादलचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, एनएसयुआयचे शिवराज मोरे, कराड दक्षिण युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष वैभव थोरात, उपाध्यक्ष समीर पटवेकर,अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, कराड दक्षिण महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सौ. विद्या थोरवडे, कराड शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा सौ. अर्चना पाटील, जि. प. सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, मंगल गलांडे, पं. स. सदस्य उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, सदस्या सौ. वैशाली वाघमारे, सौ. नंदा यादव, कराड कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सुनिल पाटील, नरेंद्र पाटील यांच्यासह जि. प. आणि पं. स. समितीचे आजी-माजी पदाधिकारी, कराड व मलकापूरचे आजी-माजी नगरसेवक तसेच कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कराड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे व शहरचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.