Meerut Building Collapse । उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखालून सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले असून लोकांना वाचवण्यासाठी सुरू असलेले बचावकार्य संपले आहे. जनावरांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. मेरठचे जिल्हा दंडाधिकारी दीपक मीना यांनी या विषयी माहिती दिली. याविषयी बोलताना मीना यांनी, “अपघाताच्या वेळी इमारतीत सुमारे 15 लोक उपस्थित होते. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबलेल्या सर्वांची सुटका करण्यात आली आहे. रविवारी सकाळी पाच जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. या काळात रात्रभर तेथे बचावकार्य करण्यात आले. लोकांच्या बचावानंतर आता प्राण्यांची सुटका करण्यात येत आहे. प्राण्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न Meerut Building Collapse । जिल्हा दंडाधिकारी दीपक मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) च्या टीम घटनास्थळी बचाव कार्यात गुंतल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्राण्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. अपघात का झाला? Meerut Building Collapse । लोहिया नगर भागातील झाकीर कॉलनीत शनिवारी हा अपघात झाला, असे डीएमने सांगितले. घरात एकाच कुटुंबातील 15 जण उपस्थित होते. घर खूप जुनं होतं आणि सततच्या मुसळधार पावसाचा घरावर खूप परिणाम झाला होता. जोरदार स्फोटाने तीन मजली घर अचानक जमीनदोस्त झाले. घराच्या तळमजल्यावर एक डेअरी चालवली जात होती. या अपघातात डझनभर गुरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. अपघाताचे खरे कारण तपासानंतरच समजेल. अलाउद्दीन असे घराच्या मालकाचे नाव आहे. तो इमारतीत डेअरी चालवत होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमींवर उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.