ठाकरे गटाला धक्का! आक्रमक महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई – शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला नेत्या मीनाताई कांबळी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मीनाताई या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्या ठाकरे गटाच्या उपनेत्या होत्या.
तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिर्डी संस्थानच्या विश्वस्त म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. त्या मातोश्री बचत गटाच्या त्या उपाध्यक्षा आहेत. मात्र आता त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. कांबळी यांच्या निर्णयामुळे आता ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
मीनाताई कांबळी यांचा महिलांमध्ये चांगला संपर्क आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी मीनाताई कांबळी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्या या दक्षिण मुंबईत अधिक सक्रिय असून त्यांचा आता मराठीबहुल भागातील शिवसेना ठाकरे गटाच्या मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदे गटाला फायदा होणार आहे.
दरम्यान, मीनाताई कांबळी यांनी 2017 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
#आदिशक्तीच्या सोहळ्यात आम्हांला #स्त्रीशक्तीचा पाठिंबा
अजून भगिनी बाहेर पडतील #उठा जरा थांबासंघटनेची बांधणी, प्रवास, जनसंपर्क केला
पण त्यांच्या तुम्ही
शून्य गोळा दिला#आमदार #खासदार #नगरसेवक
आता #नेते– #उपनेते येतायत#शिंदे_साहेबांचंच नेतृत्व #समर्थ
आहे हेच दर्शवतायतबंद… pic.twitter.com/nuj6Kl7ACJ
— Naresh Mhaske (@nareshmhaske) October 18, 2023





