Manchar : शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी मीनाक्षी वळसे पाटील
Manchar : संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती देताना सभापती मिनाक्षी वळसे पाटील म्हणाल्या की, संस्थेची वार्षिक उलाढाल 126 कोटी 48 लाख 92 हजार रुपये असून, 2025-26 या आर्थिक वर्षात दोन कोटी 26 लाख 15 हजार रुपयांचा नफा झाला आहे.

मंचर : आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी मीनाक्षी संतोष वळसे पाटील, उपसभापतीपदी अभिजीत नाटे, खजिनदारपदी शंकर गवारी आणि मानद सचिवपदी बाळासाहेब साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवारी (दि. 17) मंचर येथील संस्थेच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक पौर्णिमा सुर्वे यांनी कामकाज पाहिले.
निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, एम.एड. उच्चशिक्षित शिक्षक कृती समितीचे राज्याध्यक्ष राजू जाधव, जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाळूज, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक बाळासाहेब कानडे, नंदकुमार चासकर, उदयकुमार लोंढे, विजय वळसे पाटील, सचिन तोडकर, सुनील भेके, नारायण काळे, विकास बाणखेले, विजय डोके, मंगेश जावळे, सुभाष इंदोरे, दत्तात्रय काळे, कान्होबा डोंगरे, सोपान सैद, सखाराम मुंजाळ, भास्कर चासकर, नारायण गोरे, संजय केंगले, संतोष लबडे, दत्तात्रय मेचकर, बाबाजी गाढवे, संतोष पोखरकर आणि सुरेखा तोडकर आदी उपस्थित होते.
संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती देताना सभापती मिनाक्षी वळसे पाटील म्हणाल्या की, संस्थेची वार्षिक उलाढाल 126 कोटी 48 लाख 92 हजार रुपये असून, 2025-26 या आर्थिक वर्षात दोन कोटी 26 लाख 15 हजार रुपयांचा नफा झाला आहे. यावेळी दत्तात्रय वाळूज, महेश बढे, नंदकुमार चासकर, सुनील भेके आणि कान्होबा डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. तालुका सरचिटणीस विकास बाणखेले यांनी आभार मानले.
सभासदांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार
संस्थेच्या सभासद कल्याण निधी योजनेअंतर्गत सभासदाचे निधन झाल्यास त्यांच्या वारसांना 20 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच वैद्यकीय उपचारांसाठी 50 हजार रुपये, तर अपघातासाठी 20 हजार रुपयांची मदत देण्यात येते, अशी माहिती माजी तालुकाध्यक्ष सचिन तोडकर यांनी दिली.





