Pharmacy Strike: ई-फार्मसीविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) यांनी बुधवार 20 मे रोजी दिलेल्या देशव्यापी बंदच्या हाकेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. देशातील प्रमुख फार्मसी चेन, रुग्णालयांतील मेडिकल स्टोअर्स, जनऔषधी केंद्रे आणि अमृत फार्मसी दुकाने सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी मंगळवारी सांगितले. बहुतांश राज्ये बंदपासून दूर – (Pharmacy Strike) महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, सिक्कीम, उत्तराखंड आणि लडाखमधील अनेक राज्यस्तरीय औषध विक्रेता संघटनांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनांनी औषध पुरवठा सुरळीत ठेवण्याचे लेखी आश्वासनही दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ई-फार्मसीच्या कार्यपद्धती व नियमनासंदर्भातील चिंता व्यक्त करत AIOCDच्या प्रतिनिधींनी अलीकडेच केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (CDSCO) अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी मांडण्यात आलेल्या मुद्द्यांचा गांभीर्याने विचार सुरू असून, संबंधित नियामक चौकटीचा आढावा घेतला जात असल्याचे औषध नियामकांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. (Pharmacy Strike) रुग्णांचे हित सर्वोपरि – (Pharmacy Strike) रुग्णांना जीवनावश्यक आणि अत्यावश्यक औषधांचा अखंड पुरवठा होणे महत्त्वाचे असल्याने अनेक राज्यांतील औषध विक्रेता संघटनांनी सार्वजनिक हित लक्षात घेऊन संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचेही सूत्रांनी नमूद केले. Pharmacy Strike : संपातून माघार! महाराष्ट्रातील मेडिकल स्टोअर्स बुधवारी सुरू राहणार औषध दुकाने बंद राहिल्यास नियमित औषधांवर अवलंबून असलेल्या रुग्णांना मोठा त्रास होऊ शकतो तसेच वैद्यकीय पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे अनेक संघटनांनी औषध नियामकांच्या सकारात्मक भूमिकेनंतर संपापासून दूर राहणे पसंत केल्याचे सूत्रांनी सांगितले.