पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहर यांच्या वतीने शनिपार चौक, बाजीराव रस्ता येथे ‘मी मराठी – माझी स्वाक्षरी मराठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 3000 ते 35000 हून अधिक आबालवृद्धांनी भव्य फलकावर मराठी स्वाक्षरी करून उपक्रमात सहभाग नोंदवला. उपक्रमाला मनसे नेते अनिल शिदोरे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, संघटक प्रल्हाद गवळी, प्रदेश सरचिटणीस गणेश सातपुते, रणजित शिरोळे, किशोर शिंदे, बाळा शेडगे, प्रवक्ते योगेश खैरे, शहर उपाध्यक्ष आशिष देवधर, मनविसेचे प्रशांत कनोजिया, सचिन पवार तसेच केदार चितळे, नगरसेविका स्वप्नाली पंडीत, वर्षा तापकीर, महेश वाबळे यांनी भेट दिली. मनसे शहर सचिव वसंत खुटवड, मनविसे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ यांनी उपक्रमाचे आयोजन केले. तर रुपेश चांदेकर, करण मेहता, ऋषिकेश करंदीकर, प्रमोद उमरदंड, राहूल मुंगले, शुभम मुळे यांनी उपक्रमाला सहकार्य केले. मराठीत स्वाक्षरी करणाऱ्याला यावेळी पेढा देखील देण्यात आला. या उपक्रमाचे यंदाचे १७ वे वर्ष होते. यावेळी कॅलिग्राफी करणारे कलाकार देखील सहभागी झाले होते. मराठी भाषेचे महत्व आणि महती या उपक्रमाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आली. हेही वाचा : Holi Special Recipe: होळी स्पेशल! मखमलीसारखे नरम दहीवडे घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घ्या सोपी रेसिपी