Mayor Reservation : तुमचा महापौर कोण? मुंबईसह 29 महापालिकांची आरक्षण सोडत
Mayor Reservation | तुमचा महापौर कोण? मुंबईसह २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर.

Mayor Reservation | राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे.
तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून येथील महापौरपद अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. Mayor Reservation
तर ठाणे, लातूर आणि जालना महानगरपालिकेतील महापौरपद हे अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण सोडतीच्या माध्यमातून निश्चित केले जात आहे. लातूर मध्ये एससी प्रवर्गातील महिला महापौर असणार आहे. Mayor Reservation |
29 महापौरपदांसाठी आरक्षण- | Mayor Reservation
अनुसूचित जमाती – 1
अनुसूचित जाती – 3
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – 8
सर्वसाधारण – 17
महापालिकांसाठी कुठे कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण? | Mayor Reservation
1. नवी मुंबई: सर्वसाधारण2. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला)
3. वसई- विरार: सर्वसाधारण
4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
5. कोल्हापूर: ओबीसी
6. नागपूर: सर्वसाधारण
7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण (महिला)
8. सोलापूर: सर्वसाधारण
9. अमरावती: सर्वसाधारण (महिला)
10. अकोला: ओबीसी (महिला)
11. नाशिक: सर्वसाधारण
12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण (महिला)
13. पुणे: सर्वसाधारण (महिला)
14. उल्हासनगर: ओबीसी
15. ठाणे: अनुसूचित जाती
16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)
17. परभणी: सर्वसाधारण
18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )
19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
20. मालेगाव: सर्वसाधारण
21. पनवेल: ओबीसी
22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण
23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण
24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
25. जळगाव: ओबीसी (महिला)
26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
27. धुळे: सर्वसाधारण (महिला)
28. जालना: अनसूचित जाती (महिला)
29. इचलकरंजी: ओबीसी
हेही वाचा:
Sajjan Kumar : सज्जन कुमार यांना मोठा दिलासा ; १९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात निर्दोष मुक्तता





