राजस्थानातील बसपा आमदार घेणार मायावतींची भेट

जयपुर – राजस्थानातील सहा बसपा आमदार येत्या 1 जून रोजी पक्षाच्या प्रमुख मायावती यांची भेट घेणार आहेत. आमचा राज्यातील कॉंग्रेस सरकारला पाठिंबा असून तो कायमच राहणार आहे असेही या पक्षाच्या आमदारांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानातील कॉंग्रेस सरकार मध्ये नेतृत्व बदलाविषयी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या आमदारांच्या पाठिंब्याविषयी वेगवगळ्या अटकळी बांधल्या जात आहेत. त्यातच हे आमदार आता मायावती यांनी भेटणार असल्याने राज्य सरकारच्या स्थिरतेविषयीही शंका उपस्थित केली जात आहे.

तथापी पक्षाचे ज्येष्ठ आमदार वाजिब अलि यांनी सांगितले की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगीरीचा आढावा सादर करण्यासाठीच आम्ही पक्ष प्रमुखांना भेटणार आहोत. हे सहा आमदार सोमवारी राज्यपालांना भेटणार होते पण त्यांची ही भेट आयत्यावेळी रद्द करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष मायावती यांच्याशी चर्चा करूनच आम्ही राज्यपालांच्या भेटीविषयी निर्णय घेऊ असेही या आमदारांनी स्पष्ट केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here