Mayawati : योगींची घोषणा निवडणुकीसाठीचे पाऊल वाटते; मायावती यांची टीका
उत्तरप्रदेशातील १ लाख युवकांना पुढील ६ महिन्यांत सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. मात्र, ती घोषणा म्हणजे निवडणुकीसाठीचे पाऊल वाटते, अशी उपरोधिक प्रतिक्रिया बसपच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांनी दिली.

Mayawati : उत्तरप्रदेशातील १ लाख युवकांना पुढील ६ महिन्यांत सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. मात्र, ती घोषणा म्हणजे निवडणुकीसाठीचे पाऊल वाटते, अशी उपरोधिक प्रतिक्रिया बसपच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांनी दिली.
भाजपची सत्ता असणाऱ्या उत्तरप्रदेशात पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत विधानसभा निवडणूक होईल. त्यासाठी अवघ्या ६ ते ७ महिन्यांचा अवधी उरला आहे. अशात योगींनी सरकारी नोकऱ्यांची आकांक्षा बाळगून असणाऱ्या युवकांना दिलासा देणारी घोषणा केली. त्यावर मायावती (Mayawati) सोशल मीडियावरून व्यक्त झाल्या. संबंधित घोषणा विलंबाने उचललेले योग्य पाऊल आहे.
अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागास वर्गांसाठी राखीव असणारी रिक्त पदे भरण्याविषयीच्या घोषणेचीही संबंधित इच्छूक प्रतीक्षा करत आहेत. उत्तरप्रदेशसह संपूर्ण देशातील शालेय शिक्षणाची स्थिती सुधारण्याची मागणी बसप सातत्याने करत आहे. सुमारे ३० हजार सरकारी शाळा बंद झाल्या आहेत. त्या पुन्हा सुरू करण्याची व्यवस्था जनहिताची ठरेल.
महिलांच्या सुरक्षा-सन्मानासाठी आणि स्वावलंबनासाठी सरकारांनी योग्य प्रकारे कार्य करण्याची गरज आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावतीही (Mayawati) सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.






