मायावती तिकिटांच्या व्यापारी – मनेका गांधी

सुलतानपूर  – बसपच्या प्रमुख मायावती या तिकिटांच्या व्यापारी आहेत. पैसे घेतल्याशिवाय त्या कुणालाच त्यांच्या पक्षाची उमेदवारी देत नाहीत, असे टीकास्त्र केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांनी बुधवारी सोडले. मायावती कुणाच्याच नाहीत. नोटा मिळाल्याशिवाय त्या काहीच करत नाहीत. स्वपक्षीयांनाही त्या सोडत नाहीत. मग, देशाला आणि राज्याला कशा काय सोडतील, असा सवाल मनेकांनी उत्तरप्रदेशातील एका मेळाव्यात बोलताना केला. सुमारे तीन वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशातील बसपच्या तत्कालीन दोन आमदारांनी पक्षाच्या नेतृत्वावर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यासाठी प्रचंड रकमेची मागणी केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे बसपने त्या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले. त्या आमदारांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.