नितीश कुमार उपपंतप्रधान होणार? भाजपच्याच ‘या’ ज्येष्ठ नेत्याने केली मागणी, चर्चांना उधाण

Nitish Kumar | बिहारमध्ये यावर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नेते आता बिहारचा दौरा करत आहेत. त्यातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना देशाचे उपपंतप्रधान करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
भाजपच्याच नेत्याने असे वक्तव्य केल्याने याची जोरदार चर्चा रंगली आहे. अश्विनी कुमार चौबे म्हणाले की, नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अशा स्थितीत त्यांना देशाच्या उपपंतप्रधानपदाची जबाबदारी दिल्यास, बिहारच्या विकासाला गती मिळू शकते.
नितीश कुमार यांना उपपंतप्रधान बनवले जावे, ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. यामुळे बिहारला केंद्र सरकारमध्ये अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळेल, असेही ते म्हणाले.
#WATCH बक्सर, बिहार: भाजपा नेता अश्विनी कुमार चौबे ने कहा, “… NDA की सरकार में प्रधानमंत्री मोदी और बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार की जोड़ी राम-लक्ष्मण की जोड़ी है…मुझे ऐसा लगता है कि अब बिहार की इच्छा है कि हमारे नीतीश भाई NDA के संयोजक बनें और PM नरेंद्र मोदी के टीम में… pic.twitter.com/UAfyhlIZYq
— ANI_HindiNews (@AHindinews) April 10, 2025
ते पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्रीपद हे आता त्यांच्या साठी कोणतेही मोठे पद राहिलेले नाही. 20 वर्षे मुख्यमंत्री राहणे ही बाबच मोठी आहे. माझ्या मते बिहारची आता हीच इच्छा आहे की, नितीश भाई एनडीएचे संयोजक व्हावेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये उपपंतप्रधान म्हणून स्थान मिळवावे.’
भाजप नेत्याने अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने याची बिहारच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने देखील प्रतिक्रिया दिली. पक्षाचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केले आहे की 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील.
कोण आहेत अश्विनी कुमार चौबे?
अश्विनी कुमार चौबे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी 2014 मध्ये त्यांनी बक्सर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आणि 2019 मध्ये पुन्हा विजय मिळवला.
त्यांनी केंद्र सरकारमध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. यापूर्वी ते 1995 ते 2014 या कालावधीत बिहार विधानसभेचे पाच वेळा आमदार होते. त्यांनी बिहार सरकारमध्ये नगर विकास मंत्री, तसेच आरोग्य व लोक आरोग्य अभियांत्रिकी मंत्री म्हणूनही काम केले आहे.





