Ankita Walawalkar | बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. त्याच्या लग्नासाठी मोठी गर्दी झाली होती. त्याच्या लग्नात जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवारसह बिग बॉस मराठीमधील काही कलाकार देखील उपस्थित राहिले होते. मात्र कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता प्रभु वालावलकर या लग्नाला आली नव्हती. काही दिवसांपूर्वी अंकिताने सुरज-संजनाचं तिच्या घरी केळवण केलं. या केळवणाच्या फोटो, व्हिडीओमधूनच सुरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा समोर आला. त्यानंतर अंकिताने दोघांसोबत लग्नाच्या शॉपिंग देखील केली. ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले होते. मात्र अंकिताने आधीच सुरज-संजनाच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगितले होते. कारण त्याच दिवशी (29 नोव्हेंबर) तिला दुसऱ्या ठिकाणी लग्नासाठी जायचं होतं, म्हणूनच ती लग्नाला हजर राहू शकली नाही. अंकिताची खास पोस्ट मात्र अंकिताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहीत सुरज आणि संजनाच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रिय सूरज आणि संजना, आज तुम्ही एकत्र हातात हात घालून नव्या वाटेवर पाऊल ठेवत आहात. या वाटेवर कधी उजेड असेल, कधी अंधार, कधी सावल्या, पण एकमेकांचा आधार, माया आणि एकमेकांची सोबत असेल तर प्रत्येक अडचण सहज पार करता येते. जीवनात कितीही बदल झाले तरी एकमेकांसाठीचा आदर, आपुलकी आणि जिव्हाळा कायम ठेवा,” असे अंकिताने पोस्टमध्ये लिहिले आहे. Ankita Walawalkar | पुढे तिने लिहिले की, “छोट्या छोट्या क्षणांत आनंद शोधा, एकमेकांच्या हसण्यात जग जिंका आणि एकमेकांच्या डोळ्यांतील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. नांदा सौख्य भरे… तुमच्या नवविवाहित जीवनाला मन:पूर्वक, हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा, असं लिहीतं अंकिताने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. Ankita Walawalkar | हेही वाचा: शिंदेसेंनेतील शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयावर छापा; ‘ओके मध्ये आहे’ म्हणत अंबादास दानवेंनी डिवचलं