नवी दिल्ली | May GST Collection – सलग दुसऱ्या महिन्यात एकूण जीएसटी संकलन २ ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त राहिले आहे. मे महिन्यात १६.४ टक्क्यांनी वाढून २.०१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. यामुळे सरकारी तिजोरीत मोठी भर पडली आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन २.३७ लाख कोटींच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. जीएसटी संकलनाच्या आकडेवारीनुसार, मे २०२५ मध्ये देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा एकूण महसूल १३.७ टक्क्यांनी वाढून सुमारे १.५० लाख कोटी रुपये झाला. तर आयातीतून मिळणारा जीएसटी महसूल २५.२ टक्क्यांनी वाढून ५१,२६६ कोटी रुपये झाला. मे २०२५ मध्ये एकूण सकल जीएसटी महसूल २,०१,०५० कोटी रुपये होता.