कामशेत -मावळ तालुक्यात अजगर जातीचा सापांचा वावर वाढला असल्याचे मागील काही घटनांवरुन समोर आले आहे. बोरज गावाजवळ 15 फुट लांबीचा तर औंढे गावात अजगरांचे 3 फुट लांबीचे एक पिल्लु पकडण्यात आले. मागील महिन्यात याच परिसरार एक अजगर व दहा दिवसाच्या अंतराने एक पिल्लु पकडण्यात आले होते. यापुर्वी कामशेत, पाथरगाव, पाटण, वाकसई या भागांमध्ये देखील अजगर सापडले आहेत.
बोरज हद्दीतील वनक्षेत्रात सुमारे 15 फूट अजगर आढळल्याने मोठी खळबळ उडाली. अजगर हा त्याच्याच अधिवासात एका पाण्याच्या प्रवाहात विश्रांती घेत होता. मोठे भक्ष खाल्ल्याने त्याची हालचाल मंदावली होती. पण त्याठिकाणी बघ्यांची मोठया प्रमाणात गर्दी झाल्याने अजगर त्याठिकाणी असणे हे असुरक्षित वाटू लागले होते. शिवदुर्ग व वन्यरक्षक जीव टिमच्या स्वयंसेवकांनी त्याला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले.
दरम्यान, औंढोली गावातील एका घोड्याच्या फार्म हाऊसमध्ये अजगर असल्याचा फोन आल्यानंतर मोरेश्वर मांडेकर व नीलेश मांडेकर यांना त्याठिकाणी जाऊन अजगराचे पिल्लु रेस्कू करत ताब्यात घेतले. हे पिल्लु पाहणारे तेथील माळी मंगेश तायडे यांनाच दहा पंधरा दिवसापूर्वी त्याच्या आणखी एका बंगल्याच्या बाथरुमजवळ पूर्ण वाढ झालेला अजगर दिसला होता.
पावसामुळे वाढला अजगरांचा वावर
मावळ भाग हा अनादी काळापासून अजगर व इतर दुर्मीळ प्रजातीच्या वन्य जीवांचे हक्काचे ठिकाण आहे. ऋश्रीेर ऋर्रीपर ेष ईळींळीह खपवळर या कोशात (सर्वे) याचा उल्लेख आहे. मावळात आजही मोठ्या संख्येने अजगर आहेत. पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी भरल्याने ते बाहेर पडतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत अजगर व इतर सर्प दिसण्याचे प्रमाण वाढते.