IPL 2024 : कॉनवेनंतर CSK ला बसू शकतो आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख गोलंदाज….

Indian Premier League 2024, CSK Playing 11 : आता आयपीएल सुरू होण्यासाठी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. 22 मार्चला पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. मात्र, याआधी सीएसकेला मोठा धक्का बसू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे चार ते पाच आठवडे लीगमधून बाहेर राहू शकतो.
6 मार्च रोजी बांगलादेश विरुद्ध सिल्हेत येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पाथिराना दुखापतग्रस्त झाला आणि त्याने स्पेल पूर्ण न करताच मैदान सोडले.
मागील आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या विजेतेपदासाठी पाथिराना महत्त्वाचा ठरला होता. त्याने 12 सामन्यात 19 विकेट घेतल्या. त्याची डेथ ओव्हर बॉलिंग उत्कृष्ट होती म्हणून त्याला ‘डेथ ओव्हर स्पेशालिस्ट’ असे संबोधले जात होते. पाथीरानाला झालेली ग्रेड-1 हॅमस्ट्रिंगची दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी साधारणतः दोन आठवडे लागतात. त्यामुळे, पाथीराना संघात कधी सामील होणार हे पाहणे बाकी आहे आणि सध्या तो पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध होईल की नाही हे सांगणे कठीण आहे.
सीएसकेला हंगाम सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे अंगठ्याच्या शस्त्रक्रियेनंतर किमान पूर्वार्धात स्पर्धेबाहेर राहण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडच्या तिसऱ्या T20 सामन्यादरम्यान कॉनवेच्या बोटाला दुखापत झाली. सीएसके 22 मार्च रोजी चेपॉक येथे आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करेल.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/csk-playing-11-rachin-ravindras-debut-confirmed-due-to-conways-injury-chennai-super-kings-playing-xi-could-be-like-this/
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हांगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिशा पाथीराणा, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, शेख रशीद, मि. सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश तिक्शिना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली.





