मातंग समाजाच्या न्याय मागण्या जयंत पाटीलांकडून मान्य

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना पक्षाने सन्मानाची वागणूक द्यावी. सन्मानाचे पदे द्यावीत या आग्रही मागणीसह पुण्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी 

नेमणूक करणे पक्षातील मातंग समाजाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची विविध शासकीय समित्यांमध्ये नेमणूक करणे इत्यादी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समोर मांडण्यात आल्या होत्या.

त्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मातंग समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याचाही सहानभुतीपूर्वक विचार करून मार्गी लावण्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील कार्यकर्त्यासह मातंग समाजातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना नुकतेच पुण्यात भेटले.

त्यावेळी प्रदेशाध्यक्षानी या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून त्यांना सदरचे आश्वासन दिले आहे. पुण्याचे महापौर व शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप हे ही यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगी शिष्टमंळामध्ये सामाजिक न्याय विभागाचे माजी शहराध्यक्ष परमेश्वर लोंढे, हनुमंत कांबळे, वैजनाथ वाघमारे , रामभाऊ कसबे, शांतीलाल मिसाळ, मोहन सोनावणे, दिलीप कांबळे

अशोक जाधव , विजय बगाडे , गणेश लांडगे , महेंद्र लालबिंगे , सुनील भिसे , प्रवीण पवार , संतोष बोतालजी, आदींचा सहभाग होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.