Masur News : मसूर येथे अन्नसुरक्षा विभागाने आज दुपारी छापा टाकून ७८ हजार ९६६ रुपयांचा गुटखा जप्त केला. संबंधित पान शॉप चालकावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सातारा येथील अन्नसुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर यांनी टँकर दिली आहे. (Masur News) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ एप्रिलला दुपारी बाराच्या सुमारास मसूर गावच्या हद्दीत असलेल्या सागर पान शॉपमध्ये तपासणी करण्यात आली. या तपासणीत सुमारे ७८ हजार ९६६ रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. (Masur News) यावेळी आरएमडी पानमसाला, एम सेंटेड तंबाखू, विमल पान मसाला किंग, तसेच राजू इलायची अशा विविध प्रकारच्या पुड्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी सागर भीमराव पोकळे (वय ३५, रा. माळवाडी, ता. कराड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात तपास करत आहेत. (Masur News)