जामेना (चाड) – चाडच्या राजधानीतील लष्करी दारूगोळा डेपोमध्ये झालेल्या स्फोटात नऊ लोक ठार झाले आणि ४० हून अधिक जखमी झाले, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.स्फोटात जखमी झालेल्या ४६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटामुळे आजूबाजूचा रहिवासी भाग देखील हादरला. हा स्फोट मंगळवारी रात्री उशीरा झाल्यामुळे झोपेत असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे समजून नागरिकांनी पळ काढला. या गोदामात झालेला स्फोट मध्यरात्रीच्या आधी सुरू झाले. यामुळे जवळपासच्या इमारती हादरल्या आणि डेपोमधून स्फोटके आणि दारुगोळा बाहेर फेकला जात होता. मात्र थोड्या वेळात परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आणली गेली. या स्फोटामुळे परिसरामध्ये मोठी आग लागली. स्फोटामुळे भयभीत झालेले नागरिक घरे सोडून पळून गेल्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यास थोडा अधिक वेळ लागला असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे कारण त्वरित स्पष्ट झाले नाही. या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी केली जाईल, असे अध्यक्ष महामत डेबी इत्नो यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी अपघाताच्या घटनास्थळी तसेच जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांना भेट दिली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण चाडची लोकसंख्या अवघी १ कोटी ८० लाख इतकी आहे. अध्यक्षीय निवडणुकांपासून देशातील राजकीय परस्थिती अशांत बनली आहे. निवडणुकीत डेबी इत्नो यांता विजय झाला. त्यापूर्वी त्यांचे वडील देशाचे अध्यक्ष होते. २०२१ मध्ये त्यांच्या वडीलांचे निधन झाल्यापासून डेबी हे हंगामी अध्यक्ष होते. मात्र सुदानमधील युद्धात सहभागी होण्याच्या निर्णयामुळे त्यांना मोठा विरोध होऊ लागला आहे.