China Coal Mine Blast : उत्तर चीनमधील शांक्सी येथे कोळसा खाणीत झालेल्या भीषण गॅस स्फोटात 90 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या वेळी 247 कामगार कंपनीमध्ये काम करत होते. सुरुवातीला 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर होती, मात्र आता मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला असून सदर ठिकाणी मृतांच्या कुटुंबाचा आक्रोश पाहायला मिळत आहे. ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांच्या सुमारास झाला. स्फोटानंतर शनिवारी पहाटे 6 वाजेपर्यंत 201 कामगारांना खाणीतून बाहेर काढण्यात यश आले, मात्र 38 जण अजूनही खाणीमध्ये अडकले आहेत. खाणीत अडकलेल्या मजुरांपैकी काही मंजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. Walking: मधुमेहींसाठी चालणे ठरू शकते रामबाण! जेवणानंतर ‘इतका’ वेळ चाललात तर साखर राहील नियंत्रणात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping ) यांनी या दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी बचावकार्य अधिक गतीने आणि मोठ्या प्रमाणात राबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमीवर तातडीने उपचार सुरू असून बचाव मोहीम राबवली जात आहे. स्फोटाचे नेमके कारण काय? (China Coal Mine Blast) प्राथमिक माहितीनुसार, खाणीच्या आत अचानक मोठ्या प्रमाणावर मिथेन गॅसचे एकत्रीकरण झाले आणि त्याचा स्फोट झाला. या स्फोटानंतर खाणीत अत्यंत विषारी आणि घातक अशा कार्बन मोनोऑक्साइड वायूचे प्रमाण वाढले. यामुळे अनेक जखमी कामगारांना श्वास घेणेही कठीण झाले आणि यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. China Coal Mine Blast दरम्यान, या घटनेला कारणीभूत असलेल्या आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी संबंधित खाण व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटकही केली आहे. चीनमधील तुलनेने गरीब प्रांतांपैकी एक असलेला शांक्सी हा देशाचा कोळसा उत्पादनाचा प्रमुख केंद्र म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दशकांत खाण सुरक्षेत सुधारणा झाली. मात्र तरी, सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष आणि अपुरी अंमलबजावणी यामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. मात्र वारंवार घडत असलेल्या या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. China Coal Mine Blast हेही वाचा: Walking: मधुमेहींसाठी चालणे ठरू शकते रामबाण! जेवणानंतर ‘इतका’ वेळ चाललात तर साखर राहील नियंत्रणात