हिवाळी अधिवेशनात मास्क बंधनकारक, पत्रक जारी
Updated On:

नागपूर – करोना महामारीनंतर दोन वर्षांनी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशन काळात पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मास्क बंधनकारक करण्यात आले आहेत.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रक जारी केले आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातले सगळे अधिकारी आणि कर्मचारी यांना आणि येणाऱ्या सगळ्या नागरिकांनाही मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.





