मास्क आणायला गेली आणि चोराने केली घरफोडी
पुणे – एक महिला घराला कुलूप लावून मास्क आणायला गेल्यानंतर तीच्या घरी चोरांनी डल्ला मारला. त्यांनी घरातील सोन्याची तीन वेढण्या, एक सोन्याची अंगठी आणी रोख सहा हजार रुपये असा, तब्ब्ल 46 हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना हडपसर येथे बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी 25 वर्षीय महिला हडपसर येथील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये रहाते. ती सकाळी घराला कुलूप लावून घराच्या जवळील मेडिकल शॉपमध्ये मास्क आणायल गेली होती. ही संधी साधत चोरट्याने घराचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केली. यानंतर बेडरुमच्या कपाटातील सोन्याच्या तीन वेढण्या, एक अंगठी आणी सहा हजाराची रोकड चोरुन नेली.
महिला घरी आल्यानंतर तीला दरवाजा उघडला दिसला. यामुळे तीने घरात प्रेवश करुन तपासणी केली असता, बेडरुमच्या कपाटातील लॉकर उघडा दिसता. यामधील सर्व ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यावर तेथे सीसीटीव्ही नसल्याने चोरट्याचे वर्णन मिळू शकले नाही. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गाडेकर करत आहेत.