Masaba Gupta | अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने ऑक्टोबर महिन्यात गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने आई झाल्याचा आनंद व्यक्त केला होता. ज्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
११ ऑक्टोबरला मसाबा आणि सत्यदीप मिश्रा यांच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं. आता लेकीच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी मसाबा आणि सत्यदीपने लाडक्या लेकीच्या नावाचा खुलासा केला आहे. साबाने सोशल मीडियावरून लेकीबरोबरचा एक फोटो शेअर करत तिच्या नावाचा उलगडा केला आहे. त्याबरोबरच लेकीच्या नावाचा अर्थही सांगितला आहे.
मसाबा आणि सत्यदीपने त्यांच्या लेकीचं नाव ‘मातारा’ असं ठेवलं आहे. “मतारासह तीन महिने! हे नाव ९ हिंदू देवींच्या उर्जेचं प्रतीक आहे. शक्ती आणि ज्ञान यांना ते समर्पित आहे”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. Masaba Gupta |
View this post on Instagram
मसाबा गुप्ताने तिच्या मुलीच्या छोट्या हातासह तिच्या हाताचा एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये मसाबाच्या मनगटावर एक ब्रेसलेट आहे आणि त्यावर लेकीचे ‘मतारा’ नाव लिहिले आहे. Masaba Gupta |
मसाबा गुप्ताने 27 जानेवारी 2023 रोजी सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. लग्नाच्या एका वर्षानंतर तिनेऑक्टोबरमध्ये मुलीच्या आगमनाची आनंदाची बातमी चाहत्यांना देण्यात आली. त्यानंतर तिने तीन महिन्यानंतर लेकीचे नावही सांगितले आहे. Masaba Gupta |
हेही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला Z-Morh बोगद्याची भेट ; बोगद्याचा लष्करालाही होणार फायदा