Mardaani 3 Box Office Collection : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झालेला बॅार्डर २ चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर धुराळा घालत आहे. बॅार्ड २ ने २७५ कोटीहून अधिकचे बॅाक्स अॅाफिस कलेक्शन गोळा केले असून, लवकरच ३५० कोटींच्या घरात ही रक्कम जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्यात ३० जानेवारी या दिवशी अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला मर्दानी ३ (Mardaani 3) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगले बॅाक्स अॅाफिस कलेक्शन गोळा केले आहे. सध्या चित्रपटागृहात बॅार्डर २ धुमाकूळ घालत असून, या चित्रपटाला प्रेक्षकांचे उंदड प्रेम मिळताना दिसत आहे. त्यामुळे मर्दानी ३ चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र, या चित्रपटाच्या टीमने धाडस दाखवत हा चित्रपट ३० जानेवारीलाच प्रदर्शित करण्याचे ठरवले आणि चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली आहे. यामुळे राणीच्या मर्दानी ३ ने पहिल्याच दिवशी ३.८० कोटींची कमाई केली आहे. Mardaani 3 मर्दानी 3 हा अॅक्शन-क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. यात राणी मुखर्जी शिवानी शिवाजी रॅाय या महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. मर्दानी ३ हा २०१४ च्या मर्दानी चित्रपटाचा तिसरा भाग आहे. मर्दानी २ २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. मर्दानी ३ ची कथा मानवी तस्करी आणि मुलीवरींल अत्याचाराच्या गुन्ह्यांभोवती फिरते. या चित्रपटात रानी मुखर्जीसोबतच मल्लिका प्रसाद, जंकी बोडीवाला, जिस्सू सेंगुप्ता, डॉ. बिक्रम रॉय, मिखाइल या कलाकारांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मिनावाला यांनी केले आहे, तर यशराज फिल्मने चित्रपटाची निर्मिती केली आहे. हेही वाचा : Bhumi Padnekar : “लोकांंनी जागरूक राहणे आणि….”; भूमि पेडणेकरने सोशल मीडिया वापराविषयी व्यक्त केले मत