मराठी मालिकांमधील कलाकारांची सेटवर दिवाळी

करोनाचे सावट दिसणार नाही जराही

मुंबई – आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी. मराठी परंपरा, मराठी प्रवाह ही ब्रीदवाक्‍य जपणाऱ्या मराठी मालिकांध्येही दिवाळी सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. “रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा- कार्तिक आणि श्वेता-आदित्यची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी असेल. त्यामुळे इनामदार कुटुंबामध्ये दिवाळीची जोरदार तयारी सुरु आहे.

फराळ बनवण्याची स्पर्धाही घेण्यात आली आहे. त्यामुळे झटपट आणि खमंग फराळ कोणी बनवला याची उत्सुकता नक्कीच असेल.”सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतही गौरी आणि जयदीपची पहिलीच दिवाळी आहे. यात जयदीप गौरीला पाडव्याचं खास गिफ्टही देणार आहे. “फुलाला सुगंध मातीच’ मालिकेतील शुभमनेही कीर्तीसाठी पाडव्याचं खास गिफ्ट प्लॅन केलं आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने या दोन्ही जोड्यांमध्ये नवं नात उमलेल का याची देखिल उत्सुकता असेल. तर “सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत अंजी घर सोडून गेली आहे. आता दिवाळीच्या निमित्ताने तिचा गृहप्रवेश होणार का? हेदेखिल दिवाळी विशेष भागात पाहायला मिळेल.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून “कॉमेडी बिमेडी’ हा नवा कार्यक्रम देखिल सुरु होत आहे. यात मंगेश देसाई, किशोरी अंबिये, संतोष पवार, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, परी तेलंग, प्राजक्ता हनमघर अशा विविध सोळा विनोदवीरांच्या धमाकेदार विनोदांनी यंदाच्या दिवाळीत हास्याचे फटाके फुटणार आहेत. या दिवाळीत मालिकांमध्ये करोनाचे सावट दिसणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.