कोंढणपूर फाट्यावरील अतिक्रमणांवर हातोडा

राजगड, महामार्ग पोलीस व प्राधिकरण विभागाची कारवाई

खेड-शिवापूर -येथील कोंढणपूर फाटा येथील उड्डाण पुलाखाली असलेल्या अतिक्रमणावर गुरुवारी (दि. 30) राजगड पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे या उड्डाण पुलाखालील रस्त्यावरील अडथळा दूर झाला आहे.

कोंढणपूर फाटा येथील पुलाखाली झाल्यापासून काही महिन्यांपासून वाहनतळ झाले होते. अनेक छोट्या व्यवसायिकांनी या पुलाच्या दोनही बाजूस आपले छोटे व्यवसाय सुरु केले होते. त्यामुळे उड्डाण पुलाखाली वाहतुकीला मोठा अडथळा झाला होता. या ठिकाणी मोठी वाहने वळविण्यास अडथळा निर्माण झाला होता. पुला शेजारी बसस्थानक आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.

त्यामुळे बुधवारी राजगड, महामार्ग पोलीस आणि प्राधिकरण विभागाने येथील विक्रेते आणि वाहन चालकांना वाहने उभी करण्याबाबत सूचना दिली होती. तरीही गुरुवारी या ठिकाणी पुन्हा विविध व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली. त्यामुळे रागजड पोलीस, प्राधिकरण विभागाने पुलाखालील व्यवसायिकांची दुकाने हटविली.

यावेळी राजगडचे फौजदार समीर कदम, पोलीस हवालदार प्रमोद भोसले, सुधीर खडतरे, अमित कांबळे यांनी ही करवाई केली. कोंढणपुर फाट्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे या ठिकाणी होणारे अतिक्रमण, वाहन चालकांना चाप बसण्याची गरज आहे.

पुलाखालील रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास
कोंढणपूर फाटा येथील उड्डाण पुलाखाली असलेल्या अतिक्रमणावर गुरुवारी राजगड पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे पुलाखालील रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला आहे. यापुढेही अशीच कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा या परिसरात अतिक्रमणे वाढतच जाण्याची शक्‍यता आहे. या परिसरातील अशा ठिकाणी होणारे अतिक्रमण, वाहन धारकांना कायमचा चाप बसण्याची गरज आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.