मराठी प्रेम! मांजरेकर स्टेजवर येताच…; फिल्मफेअर सोहळ्यातील तब्बुचा तो व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांकडून कौतुक

Mahesh Manjrekar | Tabu | नुकताच मराठी सिनेविश्वातील ‘फिल्मफेअर मराठी 2025’ या पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. बॅालीवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारही या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. यावेळी कलाकारांना सन्मानित करण्यात आला. सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.
यंदाचे हे फिल्मफेअर मराठी २०२५ पुरस्काराचे दहावे वर्ष असून, बॅालीवूड अभिनेत्री तब्बुने देखील या सोहळ्यासाठी आवूर्जन हजेरी लावली होती. तिच्या देसी आणि मराठमोळ्या अंदाजाने सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. या कार्यक्रमात तिच्या हस्ते दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांना पुरस्काराची ट्रॅाफी देण्यात आली. यावेळी तब्बने मराठी बोलली. तिचा मराठीत बोलण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओवर चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. “नमस्कार, मी आज खूप खूश आहे. या सन्मानासाठी खूप आभार…मी हा अवॉर्ड अशा दिग्दर्शकाला देत आहे. ज्याने मला माझ्या आयुष्यातील महत्वाचा सिनेमा आणि महत्वाची भूमिका दिली मांजरेकर…” असे ती म्हणाली. यानंतर स्टेजवर महेश मांजेकर येताच तब्बूने त्यांना मिठी मारली. पुरस्कार मिळाल्याबद्दल मांजरेकरांनी आनंद व्यक्त केला.
“मला ट्रॉफी मिळाल्याचा आनंद तर आहेच पण त्यापेक्षा जास्त आनंद हा पुरस्कार माझी मैत्रीण तब्बूच्या हातून मिळाल्याचा आनंद जास्त आहे. माझ्या मते जगातील बेस्ट अभिनेत्री ही आहे. ” अशा भावना महेश मांजरेकरांनी व्यक्त केल्या. ‘अस्तित्व’ चित्रपटातील तब्बुच्या अभिनयाचे मांजरेकरांने कौतुक केले.
हेही वाचा : शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश; राज ठाकरेंनी सरकारला करून दिली महत्त्वाची आठवण





