बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये मराठी चित्रपट ‘स्थलपुराण’
Updated On:

बर्लिन : बर्लिन येथे सुरू झालेल्या तीन मोठ्या युरोपियन चित्रपट महोत्सवांपैकी – कॅन्स आणि व्हेनिस भारतीय प्रतिनिधी मंडळ हे भारतीय चित्रपटांच्या सहनिर्मितीसाठी आणि भागीदारी विकसित करण्यासंबंधी व्यापक चर्चा करीत आहेत.प्रतीक वत्स यांचा ‘एब आले ऊ!’, पुष्पेंद्र सिंग यांचा लैला और सात गीत आणि अक्षय इंदीकर यांचा स्थलपुराण जुनाट जागा.. या तीन चित्रपटांमुळे भारतीय सिनेमे अधोरेखित झाले आहेत.
अक्षय इंदीकर यांचा मराठी चित्रपट ‘स्थलपुराण’ हा आठ वर्षाच्या दिघूची कथा सांगतो. वडील बेपत्ता झाल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी तो तळमळीने प्रयत्न करतो. पण शेवटी शोध न लागल्याने कोकणात आयुष्याच्या संघर्षासह आजी-आजोबांबरोबर राहायला लागतो. चित्रपटाच्या कथेतील बदल आणि होणारा तोटा या दोन्ही बाजू या चित्रपटाद्वारे दाखविण्यात आल्या आहेत.

