रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटात मराठी अभिनेत्याची वर्णी

Ramayana Movie | अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रामायण‘ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. ‘रामायण’ चित्रपटात लोकप्रिय मराठी अभिनेत्याची वर्णी लागली आहे. आदिनाथ कोठारे ‘भरत’ ची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत आदिनाथने आपल्या भूमिकेबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
आदिनाथ मुलाखतीत म्हणाला की, “‘रामायण’ चित्रपटात ‘भरत’ ची भूमिका मिळणं माझ्यासाठी आशीर्वाद आहे. ‘रामायण’ हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट भव्यतेसाठी ओळखला जातो. त्यामुळे चित्रपटाचा भाग होणे माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. मुकेश छाब्रा, नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांचे मनापासून आभार त्यांनी मला या भूमिकेसाठी निवडले.”
View this post on Instagram
पुढे आदिनाथ म्हणाला की, “नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांनी चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनवर तब्बल 10 वर्षे मेहनत केली आहे. मी चित्रपटाची कथा ऐकताच थक्क झालो. चित्रपटात व्हीएफएक्स, निर्मिती आणि सादरीकरण खूप दर्जेदार आहे. मी भाग्यवान आहे की या चित्रपटाचा भाग आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की इतक्या मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली.” Ramayana Movie |
दरम्यान, ‘रामायण‘ चित्रपटाचा पहिला भाग 2026च्या दिवाळीत तर 2027च्या दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर (राम) आणि साऊथची सुपरस्टार साई पल्लवीची (सीता) जोडी पाहायला मिळणार आहे. ‘रामायण’ चित्रपटात साऊथ अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार आहे. तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात आता आदिनाथची देखील वर्णी लागली आहे. Ramayana Movie |
हेही वाचा:
‘सैयारा’ची बॉलीवूडकरांनाही क्रेझ; अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत पोहचली थिएटरमध्ये





