यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही

नागपूर – यंदाच्या शैक्षणिक सत्रात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू करण्यावर काही जणांनी याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या या निर्णयामुळे दंतवैद्यक व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू होणार नाही.

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाली आहे, तर हा कायदा नोव्हेंबर २०१८ मध्ये लागू करण्यात आला, त्यामुळे एसईबीसी कायद्याच्या कलमानुसार कोर्सची प्रवेश प्रक्रिया कायदा लागू होण्यापूर्वी सुरू झालेली असेल तर आरक्षण लागू होणार नाही. तसेच या कायद्यानुसार एकूण जागांच्या १६ टक्के जागा राखीव असतील. मात्र संविधानिक आरक्षण एकूण जागांवर लागू करण्यात येते, त्यामुळे हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचे याचिकाकर्त्यांनी यावेळी सांगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.