Maratha Reservation | ‘मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवे, आंदोलनाची पुढील दिशा…’ – मनोज जरांगे

Maratha Reservation | मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवे. तसेच सरकारने २० तारखेला आरक्षण दिले तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देण्यासाठी आमचे आंदोलन सुरू राहील, असा स्पष्ट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा रविवारी नववा दिवस होता. त्यात सकाळी वैद्यकीय पथकाने त्यांचा बीपी तपासला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
जरांगे म्हणाले, ‘सग्या सोयऱ्याची सरकारने अंमलबजावणी केली पाहिजे. ज्यांची नोंद मिळाली त्या नोंदी आधारे सग्या सोयऱ्यांना आरक्षण द्यावे. २०, २१ तारखेला सग्या सोयऱ्याची अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. जर अंमलबजावणी केली नाही. सगे सोयऱ्याची भूमिका घेतली नाही तर लगेच पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे. तसेच मराठे ओबीसीमध्येच आहेत. शंभर दोनशे लोकांसाठी मराठ्यांचे वाटोळे होईल. सहा करोड मराठ्यांची ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी आहे.
अजित पवारांनी बहुमताने मत मांडावे –
अजित पवारांनी अधिवेशनात सग्या सोयऱ्याबाबतही बहुमताने मत मांडावे. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण येऊ शकत नाही. ते ५० टक्क्यांच्या वर जाणार आहे. नव्या आरक्षणासाठी मोठ्या मोठ्या घराण्याचे ऐकावे लागेल. सरकार त्याला बळी पडत आहे असे म्हणता येणार नाही. ज्यांच्या नोंदी मिळल्या नाहीत. त्यांना नवे आरक्षण असेल तर तो गैरसमज काढून टाका. मराठे ओबीसीमध्ये आहेत. सगयासोयऱ्यांची अंमलबजावणी करा, असेही जरांगेंनी स्पष्ट केले आहे.





