मनोज जरांगेची नवी घोषणा ! 29 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु करणार आमरण उपोषण

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणासाठी सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाला वर्ष झाले. मात्र अद्यापदेखील सरकारने आंदोलकांच्या मागण्या मान्य नाही केल्या आहेत. त्यामुळे आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे.
मनोज जरांगेच्या उपोषणाला समाज बांधवांनी विरोध केला आहे. समाज बांधव उपोषण स्थळावरून हलण्यास तयार नाहीत. मराठा तरुणांना वाटतं आहे आरक्षण मिळते की नाही? त्यामुळं तरुण मुलांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या सगळ्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.आता मरेपर्यंत उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
२९ सप्टेंबरला आमरण उपोषण सुरू करणार अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली. आर या पारचे उपोषण करणार याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही असं जरांगे यांनी म्हटलं. जरांगेनी उपोषणाची घोषणा करताच लोकांनी याला मोठा विरोध केला.





