Maratha Reservation: ‘….तर एकाही मंत्र्यांस राज्यात फिरू देणार नाही’, मराठा क्रांती मोर्चाने रोखला पुणे-नाशिक महामार्ग

Updated On:
Maratha Reservation: ‘….तर एकाही मंत्र्यांस राज्यात फिरू देणार नाही’, मराठा क्रांती मोर्चाने रोखला पुणे-नाशिक महामार्ग

राजगुरूनगर – मराठा समाजाला आरक्षण मिळावे (Maratha Reservation) आणि अंतरवाली-सराटी (Antarwali Sarati) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Nashik National Highway) भामफाटा येथे खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने शनिवारी (दि.16) सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे अंकुश राक्षे, बाबा राक्षे, शंकर राक्षे, अतुल देशमुख, बाबाजी काळे, ऍड. निलेश आंधळे, बाळासाहेब चौधरी, सुभाष होले, अनिल राक्षे, विनोद टोपे, क्रांती कराळे, सुप्रिया साठे, राहुल नायकोडी, मंगेश सावंत, दत्ता मांडेकर, शांताराम भोसले, कुंदा ढेरंगे, शरद कड, गणेश काळे, विकास ठाकूर, भगवान मेदनकर,अतिश मांजरे, गोरक्ष बढे, कुशल जाधव, शरद कड यांच्यासह खेड तालुक्‍यातील सकल मराठा समाजाचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2018 च्या चाकण राजगुरूनगर (Chakan Rajgurunagar) येथे झालेल्या हिंसक आंदोलनाच्या प्रार्श्‍वभूमीवर हिंसक प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त ठेण्यात आला होता.

अंकुश राक्षे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी 40 दिवस सरकारला मुदत दिली आहे. 40 दिवस जेव्हा पूर्ण होतील आणि आरक्षण मिळाले नाही तर राज्यात कोणत्याच मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही. मागील काळात जसा क्रांती मोर्चानंतर जसा ठोक मोर्चा झाला तसाच ठोक मोर्चा काढायला लावू नका. चाकण आंदोलनात 8 -9 कोटीच्या नुकसानाची तसेच 190 जणांवरील गुन्हे मागे घ्यावेत सरकारने तशी भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

 …अन्‌ महामार्गावर आडवे झाले
मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीचे निवेदन खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी आंदोलन स्थळी येऊन स्वीकारले. निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलक आक्रमक होत रस्त्यावर आडवे झाले. त्यामुळे तणाव निर्माण झाला काही वेळानंतर आंदोलकानी महामार्ग रस्त्यावरून बाजूला येऊन आरक्षण मिळण्यासाठी घोषणाबाजी केली.

नेत्यांनी पक्षाचा झेंडा घेऊन फिरू देणार नाही
आरक्षणारुन मराठ्यांमध्ये दुफळी निर्माण करण्याचे काम राज्यातील मंत्र्यांनी करू नये. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजातील नेत्यांना पक्षाचा झेंडा घेऊन फिरू देणार नाही, असे परखड आव्हान खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोहर वाडेकर यांनी दिले आहे.

आरक्षणासाठी लॉबिंग करा
राजकीय पुढारी अनेक प्रकारचे घोटाळे घालतात तालुक्‍यातील सर्व पुढाऱ्यांना इशारा आहे जस निवडणुकीचे तिकीट कापले तर लॉबिंग करता तस आरक्षण मिळण्यासाठी लॉबिंग करा तुमचे तिकीट फिक्‍स होतील. जे पक्षाचे पुढारी आहेत त्यांनी राजीनामे द्यावेत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तालुक्‍यात फिरू देणार नाही. जिथे जिथे मराठा समाजाचे पक्षाचे पुढारी उभे राहतील तिथे तिथे आम्ही उभे राहून विरोध करू. मराठा आरक्षणासाठी तालुक्‍यातील मराठा समाजातील विविध पक्षाच्या पुढाऱ्यानी राजीनामे द्यावेत, असे आवाहन मोर्चा प्रसंगी करण्यात आले.

आणखी संबंधित बातम्या

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीला नियोजनाचा अभाव

2026-10-07 08:25:57

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीला नियोजनाचा अभाव

Chakan : वाहतूक कोंडीला नागरिकांच्या बेशिस्तीचीही जोड

2026-09-23 08:45:55

Chakan : वाहतूक कोंडीला नागरिकांच्या बेशिस्तीचीही जोड

Manoj Jarange : "आंदोलनाला सहकार्य न करण्याचे शिंदेंचे मंत्र्यांना आदेश"; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

2026-09-22 19:42:33

Manoj Jarange : "आंदोलनाला सहकार्य न करण्याचे शिंदेंचे मंत्र्यांना आदेश"; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

FDA Action : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई; 1.13 कोटींचा गुटख्याचा साठा जप्त, 6 तास सुरू होता थरारक पाठलाग

2026-09-19 20:50:22

FDA Action : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई; 1.13 कोटींचा गुटख्याचा साठा जप्त, 6 तास सुरू होता थरारक पाठलाग

Devendra Fadnavis : मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

2026-09-17 10:19:08

Devendra Fadnavis : मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले...