स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलीस उपनिरीक्षकांना दिले निवेदन
टाकळी हाजी – साबळेवाडी (टाकळी हाजी) या ठिकाणी दारूबंदी करावी, अशा मागणीचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी औट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांना दिले आहे.
साबळेवाडी येथे हळदी-कुंकू आयोजन जि. प. शाळा साबळेवाडी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, पोलीस पाटील, शोभा मंदिलकर ग्रामपंचायत सदस्या सोनल साबळे, सुनंदा उचाळे, रंजना गावडे, नंदा साबळे, साधना खोमणे, लता साबळे, सुमन साळवे यांच्या वतीने टाकळी हाजी औट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांना दारूबंदीबाबत निवेदन दिले.
यावेळी ग्रा. पं. सदस्य बाबाजी साबळे, भाऊसाहेब साबळे, दीपक साबळे, विठ्ठल साबळे, सुरेश साबळे, चंद्रकांत साबळे, नितीन साबळे, नीलेश चासकर, भगवान साबळे, संदीप चाटे, नवनाथ साबळे, योगेश साबळे, मकरंद साबळे, भागचंद साबळे, भगवान औटी, देवराम औटी, सुभाष पवार, विनोद साबळे, सचिन साबळे उपस्थित होते.
यावेळी महिलेला एक गुलाबाचे झाड देण्यात आले. पर्यावरणाच्या घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.