झारखंडमध्ये माओवादी अटकेत
Updated On:

हजरीबाग – झारखंडमधील बाचरा गावातून एका माओवाद्याला अटक करण्यात आली आहे. झारखंडमधील काटकुमसंडी जंगलात शुक्रवारी रात्री छापा घालून जितेंद्र कुमार भोक्ता या माओवाद्याला अटक करण्यात आली आणि तो तृतीया प्रस्तुती कमिटीचा सदस्य आहे.
त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, 2 जिवंत काडतुसे आणि चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. मात्र या कारवाईच्यावेळी जितेंद्र कुमार भोक्ताचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला असल्याचे पोलीस अधिक्षक कार्तिक एस. यांनी संगितले. पळून गेलेल्या अन्य माओवाद्याच शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.





