Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शहा, यांच्यासह अनेक नेते अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात तिघेही बारामतीत दाखल होणार आहेत. नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी काटेवाडीत जाऊन अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यासह झिशान सिद्दीकी, विश्वजीत कदम, नवाब मलिक आणि अनेक मान्यवर अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी विद्या प्रतिष्ठान येथे पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दरम्यान, शहरातील व्यापारी पेठा, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील घाऊक फळभाजी, भुसार बाजार बंद ठेवण्यात आला. लक्ष्मी रस्त्यासह महात्मा फुले मंडई, तसेच उपनगरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने गुरुवारी शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. हेही वाचा: Ajit Pawar: ‘अजितदादा अमर रहे’! लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला; महिलांनी टाहो फोडला