Tirupati Temple Stampede: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी; चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

Tirupati Temple Stampede: आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले. तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराच्या वैकुंठ द्वार दर्शनासाठी पास वाटप करताना ही घटना घडली.
वृत्तानुसार, ही घटना तिरुपती विष्णू निवासम येथे घडली जेथे पासचे वितरण केले जात होते. मल्लिका असे मृतांपैकी एका महिलेचे नाव असून ती तामिळनाडूची आहे. दरम्यान, जखमींना तिरुपती रुया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
#WATCH | Andhra Pradesh: Four people died in a stampede that occurred at Vishnu Nivasam in Tirupati during the distribution of Vaikunta Dwara Sarva Darshan tokens.
CM N Chandrababu Naidu spoke to officials over the phone about the treatment being provided to the injured in the… pic.twitter.com/655uJ7NEiK
— ANI (@ANI) January 8, 2025
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला शोक –
आंध्र प्रदेश सीएमओ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमाला श्रीवरी वैकुंठ द्वार येथे दर्शन घेण्यासाठी तिरुपतीमधील विष्णू निवासमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत 4 भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
सीएम नायडू यांनी घेतली घटनेची माहिती –
मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे आणि उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.





