Raj Thackeray | राज्य सरकारने हिंदी भाषाच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज दोन्ही ठाकरे बंधूंकडून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा होत आहे. आज ५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील वरळी परिसरातील डोम सभागृहात हा मेळावा पार पडत आहे. यावेळी राज ठाकरेंनी दोन्ही ठाकरेंना एकत्र आणण्यासाठीच्या प्रयत्नांबद्दल भाष्य केले. त्यादरम्यान त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला. बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, यावेळी राज ठाकरे म्हणाले. आजचा हा मेळावा, मोर्चा आणि मेळाव्याला तीच घोषणा आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे कुणी वेड्या वाकड्या नजरेनं पाहायचं नाही. कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं मी मुलाखतीत म्हटलं होतं. आज २० वर्षानंतर आम्ही एका व्यासपिठावर येत आहे. बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं,” असा थेट टोलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर…. “हिंदी सक्तीचे अचानक कुठून आले, ते मला समजलेच नाही. हिंदी कशासाठी? कोणासाठी हिंदी? त्या लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही? कुणालाही न विचारता आम्ही ते लादणार असे झाले. तुमच्या हातात सत्ता असेल, ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर…. मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तिच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने कुणी पाहायचं नाही,असा इशारच राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे. Raj Thackeray | हेही वाचा: खळखट्याक…! “मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा” चॅलेंज देणाऱ्या सुशील केडियाचं मुंबईतील अॅाफिस फोडलं