लेफ्टनंट कर्नल असल्याचे भासवून अनेकांना फसवणाऱ्या एकाला ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले. त्याच्याकडून 10 ओळखपत्रे, दोन मोबाईल,एक टॅब, प्रिंटर, लॅपटॉप, मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे, लष्कराचा पोषाख, लष्कराची महत्त्वाची ओळख चिन्हे, लष्करी बूट, पट्टा, लष्कराच चिन्ह असलेली टोपी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अंकित कुमार सिंह ( वय 23 रा. उत्सव सोसायटी किरकटवाडी मूळ- हसनपूर आमरोह उत्तर प्रदेश)असे ताब्यात घेण्यात आलेल्या तोतया अधिकार्याचे नाव आहे. त्याची पत्नी मीनाक्षीला ताब्यात घेण्यात आलेले आहे. लेफ्टनंट कर्नल असल्याचे सांगत अनेकांना फसविणारा किरकटवाडी येथे राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला पत्नीसह ताब्यात घेतले. ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करण्यात आली